साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला आहे. शनिवारी, 28 सप्टेंबर रोजी मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार असल्याने महालक्ष्मीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई येथील आय स्मार्ट फॉसेटिक पंपनीकडून सुमारे 20 जणांच्या पथकांकडून अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह मंदिर परिसरात सोमवारपासूनच स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. शनिवारी, 28 रोजी एकादशीला देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत गाभाऱयाचा दरवाजा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.
मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबादेवी आणि काळबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवात मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबादेवी आणि झवेरी बाजार परिसरात पोलिसांनी मॉक ड्रिल करून सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली.