कोल्हापुरात संजय मंडलिकांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. आज सायंकाळी ऐतिहासिक दसरा चौकात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. ‘पचास खोके.. एकदम ओके’, ‘नीम का पत्ता कडवा हैं…’, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. संजय मंडलिक यांनी त्वरित माफी मागावी, अन्यथा रोषाला सामोरे जा, असा इशारा संतप्त शिवशाहूप्रेमींकडून देण्यात आला आहे.
शाहूंचा नाही मग काय मोदींचा मान राखायचा? – संजय राऊत
राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला. आत्ताचे शाहू महाराज त्या गादीचे कारसदार आहेत. शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर काय मोदींच्या गादीचा राखायचा, असा सकाल करत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला. छत्रपतींच्या गादीचा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, अशा इशाराही त्यांनी दिला.