
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे. प्रशांत कोरटकर सध्या कोल्हापूरमधील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देताना प्रशांत कोरटकरने राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर 28 मार्चला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
दरम्यान कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर न्यायालयात मंगळवारी 1 एप्रिल रोजी सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने कोरटकरला दिलासा देण्यास नकार देत त्याचा जामीन अर्ज फेटाळला.