गणपती बाप्पा मोरया! ‘या’ तारखेपासून सुरू होणार गणेशोत्सवाचं ST बुकींग

गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. वर्षातून एकदा का होईना, पण गणेशोत्सवासाठी चारकमानी कोकणात आवर्जून जातात. आता गणपतीच्या आगमनाला केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या (4 जूलै) पासून खुले होणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात जादा एसटी फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत. परतीचे आरक्षण सुद्धा गुरुवारपासूनच सुरू होणार आहे.

लवकरच जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर होणार आहे. प्रवाशांना वैयक्तिक आरक्षणाबरोबरच समूह आरक्षणही एकाच दिवशी करता येणार आहे. सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. त्यासोबतच मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला, नेहरूनगर या ठिकाणाहून 2 आणि 3 सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.