
टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुल याच्या घरी पाळणा हलला असून पत्नी अथिया शेट्टीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी सोमवार त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. त्याने एक फोटो पोस्ट केला. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 24 मार्च 2024 रोजी अथिया आणि राहुल यांना कन्यारत्नाचा लाभ मिळाला. दरम्यान, काही वर्षे डेटिंग केल्यानंतर अथिया आणि राहुल यांनी जानेवारी 2023 मध्ये लग्न केले.
अथिया आणि राहुल यांनी संयुक्तपणे इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली. ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर अनेकजण त्यांचं अभिनंदन करत आहेत. त्याचे अभिनंदन करणाऱ्या आणि प्रेमाचा वर्षाव करणाऱ्यांमध्ये कियारा अडवाणी, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, मृणाल ठाकूर आणि इतर अनेक लोक आहेत. दरम्यान, केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात आहे. सोमवारी दिल्ली कॅपिटल्सचा लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामना सुरु आहे. यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल त्याच्या पत्नीसोबत असल्याने या सामन्यात खेळू शकला नाही.
View this post on Instagram