किरीट सोमय्यांनी पळ काढला

बांगलादेशींची घुसखोरी होत असताना केंद्र सरकार काय करते, असा सवाल विचारताच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी नाशिक येथे पत्रकार संवादातून पळ काढला. मालेगावात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक आहेत. तेथील महापालिका त्यांना बोगस जन्मदाखले देते, असे आरोप सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. हे दाखले तपासले जावेत, ते देणाऱयांवर कारवाई करावी या मागणीसाठी त्यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बांग्लादेशी नागरिक सीमेवरून घुसखोरी करतात, याबाबत केंद्र सरकार काय करते, असा प्रश्न विचारताच सोमय्या संतप्त झाले. मालेगावातील बांगलादेशी हा विषय माझ्यासाठी प्राधान्याचा आहे. बाकी नंतर पाहता येईल, असे म्हणत त्यांनी पळ काढला.