लक्षवेधी – जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी

ब्रिटनचे राजा चार्ल्स यांची प्रकृती बिघडली

ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. राजा चार्ल्स सध्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. उपचाराचे दुष्परिणाम झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे बकिंगहम पॅलेसने म्हटले आहे. प्रकृती बिघडल्याने शुक्रवारचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू असून काळजी करण्यासारखे काहीही नाही, असे सांगण्यात आले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी दिली. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल ट्रम्प यांनी अमेरिकन मुस्लिमांचे आभार मानले. निवडणुकीत मुस्लिम समुदाय आमच्यासोबत होता. त्यामुळे मी राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत तुमच्यासोबत राहीन, अशी ग्वाही ट्रम्प यांनी मुस्लिम समाजाला यावेळी दिली.

अजय देवगणच्या रेड-2’चा टीझर प्रदर्शित

बॉलीवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणचा ‘रेड-2’ हा चित्रपट येत्या 1 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 2018 साली आलेला ‘रेड’ चित्रपट सुपर हिट ठरला होता. हा या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या टीझरमध्ये अजय देवगण पुन्हा एकदा अमय पटनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा रितेश देशमुखसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय वाणी कपूर, रजत कपूर, सौरक्ष शुक्ला, सुप्रिया पाठक, अमित सियाल, यशपाल शर्मा हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.

ओप्पो एफ 29 सीरिज हिंदुस्थानात लाँच

ओप्पो पंपनीने आपली ‘एफ 29’ सीरिज हिंदुस्थानात लाँच केली. या पह्नची डिझाईन खास हिंदुस्थानासाठी तयार करण्यात आली म्हणून याला टिकाऊ चॅम्पियन म्हटले आहे. ‘ओप्पो एफ 29’ आणि ‘ओप्पो एफ 29 प्रो’ हे दोन पह्न केवळ मेड इन इंडिया नव्हे तर टिकाऊसुद्धा आहे. या पह्नला धूळ आणि पाण्याने काहीच फरक पडत नाही. ‘एफ 29’ सीरिजमध्ये जागतिक दर्जाचे इंजिनीयरिंग, मिलिट्री ग्रेडचा मजबूतपणा, उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि दमदार बॅटरी परफॉर्मन्स यांचे मिश्रण आहे. या पह्नची विक्री सुरू करण्यात आली आहे.

कपात! इन्फोसिसने 45 ट्रेनीला कामावरून काढले

आयटी क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी कपात केली जात आहे. हिंदुस्थानातील आयटी पंपनी इन्पहसिसने याआधीच कर्मचारी कपात केलेली असताना आता 40 ते 45 प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) ला कामावरून काढून टाकले आहे. ज्या ट्रेनीला कामावरून काढले आहे त्यांना ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे. मूल्यांकनासाठी अतिरिक्त वेळ आणि अनेक संधी देऊनही ते फेडरेशन स्किल्स ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी पात्रता निकष पूर्ण करू शकले नाहीत. ज्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे, असे पंपनीने ई-मेलमध्ये म्हटले आहे. फ्रेशर्सना ही प्रक्रिया उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी आहेत.