किया इंडिया या आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने 8.99 लाख रूपयांपासून सुरू होणाऱ्या आकर्षक किमतीत नवीन किया सिरॉस लाँच केली आहे. किया सिरॉस मध्यम व कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणींमध्ये नवीन एसयूव्ही सेगमेंटमध्ये दाखल झाली आहे. कंपनीचे प्रीमियम मॉडेल्स ईव्ही9 व कार्निवलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण केले आहे.
अद्वितीय तंत्रज्ञान व स्मार्ट कनेक्टीव्हीटी
किया सिरॉसमध्ये सेगमेंट-फर्स्ट ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्टम आहे, जी ऑटोमॅटिकली 16 कंट्रोलर्सचे अपडेट करते, ज्यासाठी डिलरशिपला भेट देण्याची गरज नाही. हे इनोव्हेशन सामान्यत: लक्झरी वेईकल्समध्ये दिसून येते. किया कनेक्ट 2.0 सिस्टममध्ये 80 हून अधिक वैशिष्ट्यांची व्यापक श्रेणी आहे. जी विनासायास कनेक्टीव्हीटी आणि इंटेलिजण्ट वेईकल मॅनेजमेंटच्या माध्यमातून ड्रायव्हिंगचा अनुभव सुनिश्चित करते. तसेच, कियाने किया कनेक्ट डायग्नोसिस (केसीडी) सादर केले आहे, जे वापरकर्त्यांना दूरूनच त्यांच्या वेईकलच्या स्थितीचे मूल्यांकन करण्याची सुविधा देते आणि किया एडवान्स्ड टोटल केअर (केएटीसी) सक्रियपणे ग्राहकांना टायर रिप्लेसमेंट्स व मेन्टेनन्स अशा आवश्यक सर्व्हिसेसबाबत माहिती देते.
प्रीमियम आरामदायीपणा व एैसपैस इंटीरिअर्स
2,550 मिमी व्हीलबेससह किया सिरॉस प्रवाशांच्या आरामदायीपणाला प्राधान्य देते. 76.2 सेमी (30 इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपीटप्रमाणे सेवा देते, ज्यामधून विनासायास डिजिटल इंटरफेस मिळते.
किया सिरॉस दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे
• स्मार्टस्ट्रीम 1.0-लिटर टूर्बो पेट्रोल इंजिन (88.3 केडब्ल्यू/120 पीएस, 172 एनएम)
• 1.5-लिटर सीआरडीआय डिझेल इंजिन (85 केडब्ल्यू/116 पीएस, 250 एनएम)
दोन्ही इंजिन्स मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसोबत कियाचे 6एमटी कन्फिग्युरेशन असलेल्या पहिल्याच स्मार्टस्ट्रीम जी1.0 टर्बो जीडीआयसह ऑफर करण्यात आले आहेत. सिरॉस एचटीके, एचटीकेक+, एचटीएक्स, एचटीएक्स+ या चार ट्रिम्समध्ये. त्याचबरोबर गाडी आठ रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच ग्लेशियर व्हाइट पर्ल, स्पार्कलिंग सिल्व्हर, प्यूटर ऑलिव्ह, इंटेन्स रेड, फ्रॉस्ट ब्ल्यू, अरोरा ब्लॅक पर्ल, इम्पेरिअल ब्ल्यू आणि ग्रॅव्हिटी ग्रे या आठ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
किंमत व उपलब्धता
किया सिरॉससाठी बुकिंग्ज देशभरातील किया डिलरशिप्समध्ये किंवा कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून 25,000 रूपयांच्या किमान पेमेंटसह सुरू आहे. एडीएएस वैशिष्ट्ये 80,000 रूपयांच्या अतिरिक्त खर्चामध्ये आणि टॉप ट्रिमच्या किंमतीपेक्षा अधिक रकमेमध्ये उपलब्ध आहेत.