दिवसा इमारतीची रेकी, रात्री चोऱ्या; चोरट्य़ाने फोडले अनिवासी हिंदुस्थानी नागरिकाचे घर

अनिवासी हिंदुस्थानी आणि एका खासगी पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयाच्या घरी घरफोडी केल्याप्रकरणी एकाला खार पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. दीपक खबळे असे त्याचे नाव आहे. तो स्पायडरमॅन स्टाईलवर परांचीवरून वर जाऊन हातसफाई करतो. तो दिवसा डागडुजी सुरू असलेल्या इमारतीची रेकी करतो व रात्रीच्या वेळीस तो चोऱ्या करतो अशी त्याची मोड्स ऑपरेंडी आहे.

तक्रारदार हे अनिवासी हिंदुस्थानी असून ते खार परिसरात राहतात. त्याच्याकडे एकूण पाच नोकर काम करतात. इमारतीच्या दहाव्या मजल्यावर नोकरांसाठी रूम आहे. 31 डिसेंबरला ते झोपेतून उठले तेव्हा त्यांना घरातील सीसीटीव्ही पॅमेऱयाचे मॉनिटर बंद दिसले. त्यांनी डीव्हीआर शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो डीव्हीआर त्यांना मिळाला नाही. त्यानंतर दहाव्या मजल्यावरील कार्यालयाची पाहणी केली. तेथेदेखील चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरटय़ाने 24 हून अधिक महागडी घडय़ाळे, मोबाईल, डिजिटल पॅमेरा असा 50 लाखांचा मुद्देमाल चोरून पळ काढला. घडल्याप्रकरणी त्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त परमबीर सिंग दहिया यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक वैभव काटकर, सहाय्यक निरीक्षक तुषार काळे, उपनिरीक्षक पुंभारे, वैध, काच्चे, शिर्पे, तोरणे, लहामगे, जाधव, गळवे, हांडगे आदीच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि दीपकला दहिसर येथून ताब्यात घेतले.