
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या वाहनाला खलिस्तानी समर्थकांनी घेराव घालून जयशंकर यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला. तसेच मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना आज घडली. यावेळी एकजण त्यांच्या वाहनासमोर आला आणि त्याने तिरंगा फाडला. या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.