पंजाबात झळकले खलिस्तानी पोस्टर्स

खलिस्तानवादी दहशतवादी गुरुवंतसिंग पन्नूच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा पंजाबात अनेक ठिकाणी पोस्टर्स झळकल्याचे समोर आले आहे. पन्नूने या पोस्टर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केला असून एक्सवरून पंजाबचे मुख्यमंत्री  भगवंत मान यांनाही धमकी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत होते तेव्हा पंजाबमध्ये हे खलिस्तानी पोस्टर्स लागले होते असे पन्नू एक्सवरून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बोलताना दिसत आहे.