पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानचा प्रश्न गंभीर होत असून वॉन्टेड असलेले तीन खलिस्तानी दहशतवादी उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये उडालेल्या एका चकमकीत ठार झाल्याचे वृत्त आहे.
पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलीस चौकीवर कथित हल्ला केल्याचा आरोप असलेले तीन खलिस्तानी दहशतवादी उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी पोलिसांशी उडालेल्या चकमकीत तिन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग आणि जसनप्रीत सिंग असे आरोपी खलिस्तान कमांडो फोर्स नावाच्या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित आहेत.
चकमकीनंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन एके-47 रायफल आणि एक ग्लॉक पिस्तूलही जप्त केल्याची माहिती मिळते आहे.