![News (3)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/News-3-696x447.jpg)
चाहतीने दिली 72 कोटींची संपत्ती
अभिनेता संजय दत्त याच्या एका चाहतीने कमाल केली आहे. तिने संजय दत्तच्या नावावर स्वतःची कोटय़वधीची संपत्ती केली. जेव्हा संजूबाबाला संपत्तीबद्दल समजलं, तेव्हा त्यालादेखील मोठा धक्का बसला. 2018 मध्ये संजय दत्तला पोलिसांचा फोन आला होता. तेव्हा पोलिसांनी अभिनेत्याला चाहती निशा पाटीलबद्दल सांगितले. निशा पाटील तिच्या मृत्यूनंतर संजूबाबाच्या नावावर 72 कोटींची संपत्ती सोडून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
संजय दत्तच्या वकिलांनी केलेल्या वक्तव्यानुसार, चाहतीच्या 72 कोटींच्या मालमत्तेवर संजय दत्त दावा करणार नाही.
‘केजीएफ’ फेम अभिनेता यश ‘टॉक्सिक’ रुपात
‘केजीएफ’ फेम अभिनेता यश याचा लवकरच ‘टॉक्झिक ः अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स’ हा चित्रपट येत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची वेगवेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. हा चित्रपट फक्त पॅन इंडियाच नव्हे तर पॅन वर्ल्ड ठरणार आहे. चित्रपटाचे बजेट एक हजार कोटी रुपये आहे.
बिल गेट्स रमले स्टीव्ह जॉब्जच्या आठवणीत
स्टीव्ह जॉब्ज आणि बिल गेट्स तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज. दोघे प्रतिस्पर्धी असले, तरी ते एकमेकांची नेहमीच प्रशंसा करतात. नुकताच बिल गेट्स यांनी रंजक किस्सा सांगितला. डिझाईन अधिक चांगले करण्यासाठी स्टीव्ह जॉब्ज यांनी बिल गेट्सला एकदा ऑसिड (एलएसडी) घे, असा सल्ला दिला होता, अशी आठवण बिल गेट्स यांनी सांगितली.
गायक एड शीरनचा स्ट्रीट शो पोलिसांनी थांबवला
प्रसिद्ध ब्रिटिश गायक एड शीरन सध्या हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आहे. बंगळुरूमध्ये त्याची का@न्सर्ट होणार आहे. त्याआधी त्याने चर्च स्ट्रीटवरील फुटपाथवर सादरीकरण केले. मात्र पोलिसांनी शीरनचा कार्यक्रम मध्येच थांबवला. शीरनच्या टीमने प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी कार्यक्रम थांबवला.
ओटीटीवर अश्लीलता अन् हिंसेचा भडिमार
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ओटीटीवर काम केले नाही. यावर एका मुलाखतीत ती म्हणाली की, माझ्या काही मर्यादा, बंधने असल्यामुळे मी अनेक प्रोजेक्ट येऊनही काम करण्यास नकार दिला. सेक्सुअलिटी, हिंसा आणि न्यूडिटी हे प्रत्येक गोष्टीचा भाग असायला हवे का? या अट्टाहासाने हल्ली जे केले जाते ते मला थोडे जास्तच वाटते.