
केएफसी कंपनीने फ्राईड चिकन फ्लेवरची टूथपेस्ट मार्केटमध्ये आणली आहे. केएफसीच्या 11 औषधी वनस्पती आणि मसाल्याच्या अद्वितीय मिश्रणाने बनलेली टूथपेस्ट ज्युसी फ्राईड चिकन खाल्ल्याचा अनुभव देते, सोबत ताजा श्वास आणि स्वच्छ तोंडाची हमी देते. केएफसीने ही आगळीवेगळी टूथपेस्ट लाँच केल्यापासून तिच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. अवघ्या 48 तासांत सर्व माल संपला आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॅण्ड असलेल्या ‘हिस्माईल’ कंपनीसोबत केएफसीने भागीदारीत ही टूथपेस्ट लाँच केली आहे. ती फ्लुओराईडमुक्त असून दातांवर सफेद डाग पडत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. टूथपेस्टची किंमत सुमारे 13 डॉलर म्हणजे 1120 रुपये एवढी आहे.