जगात अनेक जण फिटनेस मंत्र सांगत असतात. मात्र अमेरिकेच्या केविन कुलम याची गोष्टच वेगळी आहे. फिटनेस फ्रीक समजल्या जाणाऱया केविनने दहा लाख पुशअप्सचा विक्रम केलाय. 2015 पासून तो पुशअप्स करतोय. एवढे करून केविन थांबलेला नाही, तर त्याने या विक्रमाला मानसिक आरोग्य जागरुकता अभियानाचा भाग बनवले आहे. केविन कुलम सांगतो, त्याची मोहीम केवळ शारीरिक फिटनेसपुरती मर्यादित नाही. मानसिक आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्टय़ त्याने ठेवले आहे.