घर, नोकरी सांभाळून दोन मुलींची आई यूपीएससी पास, एक स्वप्न साकार करण्यासाठी सात वेळा प्रयत्न

लग्न झाल्यानंतर महिला घरप्रपंच सांभाळण्यात व्यस्त होतात. मुलांचा सांभाळ करण्यासाठी आपल्या इच्छा-आकांक्षांवर पाणी सोडतात, परंतु केरळच्या एका महिलेने घरप्रपंच, दोन मुलींचा सांभाळ आणि नोकरी करत सातव्या प्रयत्नात यूपीएससी पास केली आहे. निसा उन्नाराजन असे या महिलेचे नाव आहे. निसा यांना दोन मुली असून पहिली मुलगी नंदना 11 वर्षांची, तर दुसरी थान्वी ही 7 वर्षांची मुलगी आहे. मुलींचा सांभाळ करून यूपीएससी पास करणे सोपे नाही, परंतु उषा उन्नाराजन यांनी स्वतःचे स्वप्न साकार करून महिलांपुढे एक आदर्श घालून दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत 1000 वी रँक मिळवून त्या आता दिव्यांग श्रेणीत सनदी अधिकारी बनल्या आहेत. निसा उन्नाराजन यांनी तिरुवनंतपुरमच्या एका खासगी कोचिंग सेंटरमधून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना कोट्टायमचे उपनिरीक्षक रंजीत यांच्याकडूनही प्रेरणा मिळाली. त्यांना कर्णदोष होता, परंतु तेही सनदी अधिकारी असल्याने उषा यांनी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. माझ्यासारखे आव्हान असूनही पुणीतरी या वाटेवरून चालले आहे याची माहिती मिळाल्यानंतर मला हिंमत मिळाली. निसा यांनी स्वतःला प्रेरित करण्यासाठी बायोग्राफिक सक्सेस स्टोरी व मोटिव्हेशनल व्हिडीओची मदत घेतली, असेही सांगितले.

n निसा उन्नीराजन यांनी वयाच्या चाळीशी नंतर यशाला गवसणी घातली आहे. चाळीशीनंतर अनेक जण अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात किंवा परीक्षा देण्याचे टाळतात. परंतु, निसा यांनी वयाकडे न पाहता आपले प्रयत्न सुरूच ठेवले. लग्नानंतर वयाच्या 35 व्या वर्षापासून त्यांनी आयएएस परीक्षा द्यायला सुरू केली होती. थोडे उशिरा मिळाले. परंतु, लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याने निसा यांनी आनंद व्यक्त केला.

कुटुंब पाठीशी राहिले

निसाला यूपीएससीची तयारी करण्यासाठी कुटुंबाची भरभक्कम साथ मिळाली. निसाचे पती सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. त्यांनी निसाला वेळोवेळी मदत केली. तसेच पोलीस विभागातून निवृत्त झालेले वडील व आईनेदेखील वेळोवेळी मदत केली. निसाने याआधी सहा वेळा यूपीएससीची परीक्षा दिली, परंतु प्रत्येक वेळी अपयश आले. सातव्या वेळी मात्र यश मिळाले.