बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढल्या; आक्षेपार्ह जाहिरातीप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी

आक्षेपार्ह जाहिरातीप्रकरणी बाबा रामदेव चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आता त्यांच्याविरोधात केरळमधील एका न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशातील काही न्यायालयांमध्ये पतंजलीच्या उत्पादनांबाबत खटले दाखल करण्यात आले आहेत. आता केरळमधील एका न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

पलक्कड जिल्हा न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीवेळी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधआत हे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्या फार्मसीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला हे दोघेही उपस्थित नव्हते. न्यायालयाने दोघांनाही 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याबाबत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यांना 1 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे ते न्यायालयात हजर राहू शकतील. हे प्रकरण दिव्या फार्मसीने प्रकाशित केलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींशी संबंधित आहे.

योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल आहेत. यामध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, ट्रेडमार्क उल्लंघन यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलीला दिलासा दिला असला तरी, पुन्हा न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले तर शिक्षा होऊ शकते, अशी ताकीद न्यायालयाने दिली होती. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात अजामीनपाक्ष वॉरंट जारी झाले आहे.

दिव्या फार्मसीने दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींबाबत तक्रार दाखल केली होती. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने केरळ न्यायालयाने शनिवारी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. औषध ​​निरीक्षकांनी द ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. विशिष्ट रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी विशिष्ट औषधांच्या जाहिरातींना प्रतिबंधित करते. लैंगिक सुखासाठी मानवांच्या क्षमतेची देखभाल किंवा सुधारणा करण्याचा दावा करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींना प्रतिबंधित करते. कायद्याअंतर्गत बनवलेल्या नियमांमध्ये प्रदान केलेल्या कोणत्याही रोग, विकार किंवा रोगांचे निदान, उपचार, शमन, उपचार किंवा प्रतिबंध असल्याचा दावा करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींना प्रतिबंधित करते. या प्रकरणात दिव्या फार्मसी हे पहिले आरोपी, आचार्य बाळकृष्ण हे दुसरे आरोपी आणि बाबा रामदेव हे तिसरे आरोपी आहेत.

बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद यांनी दिलेला सार्वजनिक माफीनामा स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रकरणे नंतर बंद केली. मात्र, आता केरळ न्यायालयाच्या या वॉरंटमुळे बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.