केंद्रातल्या भाजप सरकारने केरळची आर्थिक स्वायतत्ता हिरावून घेतली, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची टीका

भाजप सरकारने जीएसटी प्रणाली आणली आणि केरळची आर्थिक स्वायतत्ता हिरावून घेतली, अशी टीका केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची केली.

केरळमध्ये एका सभेत बोलताना पिनाराई म्हणाले की, केंद्रातलं भाजप सरकार नवउदारमतवादी धोरणं राबवू पाहत आहेत. पण फक्त केरळ सरकारने विकासाचे एक वेगळे मॉडेल राबवण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला हे सहन नाही झालं. त्यांनी राज्य सरकारविरोधात कारवाया सुरू केल्या. भाजपने देशात जीएसटी प्रणाली लागू केली. त्यामुळे केरळ सरकारने कर आकारण्याचे हक्क गमाले आणि राज्याची आर्थिक स्वायतत्ताही गमावली असेही पिनराई म्हणाले.