कारच्या नंबरसाठी मोजले 46 लाख

केरळमधील एका व्यक्तीने चार कोटी रुपयांची महागडी लँम्बोर्गिनी कार खरेदी केल्यानंतर कारच्या नंबर प्लेटसाठी तब्बल 46 लाख रुपये मोजले आहेत. केएल 07 डीजी 0007 असा हा नंबर आहे. हा नंबर केरळमधील आतापर्यंतचा सर्वात महाग नंबर ठरला आहे. कोच्चीमधील कंपनी लिटमस 7 सिस्टेम्स कन्स्लटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि संस्थापक वेणू गोपालकृष्णन यांनी नुकतीच लँम्बोर्गिनी उरूस परफॉर्मन्ट कार खरेदी केली होती. वेणू यांनी कारसाठी जो पसंतीचा 0007 नंबर खरेदी केला आहे. त्या नंबरचा लिलाव करण्यात आला. या नंबरसाठी सर्वात आधा 25 हजारांची बोली लागली. शेवटी गोपालकृष्णन यांनी 45.99 लाख बोली लावून हा नंबर खरेदी केला. या लिलावात केएल 07 0001 या नंबरला 25.52 लाखांची बोली लागली. वेणुगोपल यांनी या कारचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वेणू गोपालकृष्णन यांच्याकडे आणखी महागडय़ा कार आहेत.