
देशात मंकिपॉक्सचे पहिला रूग्ण मिळाल्यानंतर बंगळुरू विमानतळावर हाय अॅलर्ट जारी केला आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्रवाशांचे चाचणी अनिर्वाय करण्यात आली आहे. राज्यात मंकिपॉक्स पसरण्यापासून रोखण्यासाठी आयसोलेशन प्रोटोकॉलचे कठोरपणे पालन करत दररोज 2000 प्रवाशांचे चाचणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत देशातील पहिला मंकिपॉक्सचा रूग्ण आढळला होता.
केम्पेगौडा आंतरराष्ट्राय विमानतळावर टेस्टसाठी चार डेडीकेटेड कियॉस्क लावले होते. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्यातून जावे लागते. येथे मंकीपॉक्सची चाचणी केली जात आहे आणि इथे कोणत्याही प्रवाशाला सूट दिली जाणार नाही. आंततराष्ट्रीय प्रवाशांना आयसोलेशन प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे.
बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमीटेडचे प्रवक्ते म्हणाले की, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आरोग्य आणि सुरक्षेबाबतचे नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचे थॉरोसीची चाचणी केली जात आहे. एक-एक प्रवाशाची स्क्रिनिंग केली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशासाठी आयसोलेशन झोन बनवण्यात आला आहे. येथे सर्व प्रोटोकॉल्स, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आहे. विशेष करुन आफ्रिकी देशांची यात्रा करणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे.
विमानतळ प्रशासनाने सांगितले की, आमची मेडीकल सर्विस, हेल्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाबरोबर संपूर्णपणे परिस्थिती हातळण्यासाठी सक्षम आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ताप, स्किन रॅशेस, स्थायूंचा ताण, डोकेदुखी, कंबरदुखी ही मंकीपॉक्सची लक्षणे आहेत. विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांनी विमानतळावरील तपासणीत सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाने प्रवाशांना केले आहे. राज्यात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही चाचणी अनिवार्य आहे.