Lemon Tea- लेमन टी पिण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या आणि मगच प्या! वाचा सविस्तर

दुधाच्या चहापेक्षा लेमन टी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर मानला जातो. विशेषतः वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लेमन टी चे सेवन करु शकता. लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. कोणत्याही ऋतूत तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी, तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून पिऊ शकता. असे केल्याने तुम्ही दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते. त्याचबरोबर, लेमन टी पिल्याने नुकसान देखील होऊ शकते.

 

लेमन टी कोणी पिऊ नये

 

आंबट पदार्थांची ऍलर्जी

ज्यांना आंबट पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांनी लेमन टी अजिबात पिऊ नये. लेमन टी मध्ये मध किंवा इतर गोष्टी घालत असाल तर त्यामुळे गंभीर ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या सर्वांव्यतिरिक्त, तोंड आणि घशात सूज येण्याची समस्या देखील होऊ शकते.

 

 

ज्यांना अ‍ॅसिडिटीची समस्या आहे

ज्यांना अ‍ॅसिडिटीची समस्या आहे त्यांनीही लेमन टी पिऊ नये. गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग (GERD) मध्ये, लेमन टी पिल्याने पोटातील आम्ल वाढू शकते. यामुळे छातीत जळजळ आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, लेमन टी पिणे नक्कीच टाळा.

 

मायग्रेनचे रुग्ण

लेमन टी मध्ये टायरामाइन हे अमिनो आम्ल असते. ज्यामुळे मायग्रेनच्या रुग्णाला समस्या येऊ शकतात. मायग्रेनच्या रुग्णांनी लेमन टी पिऊ नये कारण त्यामुळे मायग्रेनचा झटका येऊ शकतो. यामुळे डोकेदुखीची समस्या अधिक वाढू शकते.

 

इतर आजारांचे औषध घेत असाल

तुम्ही उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, मायग्रेन सारख्या कोणत्याही आजारासाठी नियमित औषध घेत असाल तर तुम्ही लेमन टी पिऊ नये कारण त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)