
कश्मीर हा भारताचाच भाग आहे. पाकिस्तानचा कश्मीरवर कोणताही अधिकार नाही, अशा कडक शब्दांत हिंदुस्थानने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी जम्मू-कश्मीर मुद्दय़ावर बोलताना म्हटले होते की, आम्ही हे विसरणार नाही. असीम मुनीर यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेताना हिंदुस्थानने कश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले.
विदेशात बोलताना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी टू नेशन थेअरीचे समर्थन केले. 1947ला पाकिस्तानचे निर्माण झाले. आमचे स्पष्ट मत आहे की, ही आमची दुखरी नस होती. ती कायम राहील. आम्ही त्याला विसरणार नाही. आम्ही आमच्या कश्मीरमधील लोकांचे बलिदान विसरणार नाही, असे म्हटले होते. त्यावर हिंदुस्थानने जोरदार प्रत्युत्तर दिले. कोणतेही विदेशी तत्त्व कश्मीरला आपल्या नियंत्रणाखाली घेऊ शकत नाही. पाकिस्तानने केलेला दावा पूर्ण निराधार आहे. कश्मीर हे हिंदुस्थानातील केंद्र शासित प्रदेश आहे. याचा पाकिस्तानशी काडीमात्र संबंध नाही.