कोविड काळाचे वास्तव मांडणारा कथासंग्रह, दिल्लीच्या साहित्य संमेलनात काशिनाथ माटल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

कोविड काळाचे वास्तव मांडणाऱ्या  कथा काशिनाथ माटल यांच्या लेखणीतून उतरल्या आहेत. ‘सावट’ असे त्यांच्या कथासंग्रहाचे नाव आहे. दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या कथासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

येत्या 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होणाऱ्या साहित्य संमेलनात ‘संतकवी महिपतीबुवा’ प्रकाशन मंचावर काशिनाथ माटल यांच्या ‘सावट’ आणि ‘बेवारस’ या दोन कथासंग्रहांचे प्रकाशन होणार आहे. कोविडच्या काळात ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना पीडितांना वाचविण्याचे काम केले आहे, अशा कोविड योद्धय़ांच्या प्रेरक कथा माटल यांनी लिहिल्या आहेत. चपराक प्रकाशनच्या 25 पुस्तकांचे प्रकाशन होण्याचा विक्रम होणार असल्याचे  संमेलनाच्या ग्रंथ प्रकाशन समितीचे अध्यक्ष, प्रकाशक घनश्याम पाटील यांनी सांगितले.