अंधेरीत कार्यसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार

शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्यावतीने कार्यसम्राट चषक दिवस – रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वीरा देसाई रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे शनिवारी या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत विभागातील 32 संघ सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना अध्यक्ष व मुंबई क्रिकेट असोसिएशन निवड समिती सदस्य निलेश भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विधानसभा संघटक वीणा टॉक, सहसंघटक ज्योत्स्ना दिघे, संजय साखळे, सुधाकर अहिरे, दयानंद कड्डी, उदय महाले, शरद प्रभू, दिपक सणस, रेवती सुर्वे, रोहिणी माळकर, मिनाली पाटील, राजेश नारकर, रमेश वांजळे, सतीश शेलार उपस्थित होते.