करवीर मतदारसंघात सर्वाधिक 85 टक्के तर कुलाब्यात सर्वात कमी 44 टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघात झाले. करवीरमध्ये 84.96 टक्के मतदानाची नोंद झाली तर सर्वात कमी 44.44 टक्के मतदान मुंबईतील कुलाबा मतदारसंघात झाले.

मागील पाच वर्षांच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत यंदा सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपुरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वाधिक दिसून आला, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.