धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा

धनंजय मुंडे इयांची आमदारकी सहा महिन्यात जाणार, असा दावा करून शर्मा यांनी केला आहे. एका वर्षात परळीत पुन्हा निवडणूक होणार, असंही त्या म्हणाल्या आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता. याबाबत करुणा शर्मा यांनी तक्रार केली होती. यातच त्यांच्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे.

करून शर्मा, “धनंजय मुंडे यांनी फसवणूक केली आहे. यात त्यांना सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते. यात त्यांची आमदारकीची 100 टक्के रद्द होणार.” त्या म्हणाल्या की, सहा महिने किंवा एक वर्षात परळीत पुन्हा निवडणूक होणार.”