Photo – कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

कार्तिक वारीचा आज मुख्य सोहळा मंगळवार रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही सजावट विठ्ठल भक्त राम जांभुळकर पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे. सजावट सेवेसाठी 30 प्रकारच्या विविधरंगी सुगंधी देशी विदेशी फुलांसह करण्यात आली आहे. यासाठी पांढरी शेवंती, भगवा झेंडु, पिवळा झेंडू, अष्टर, अशोकाची पाने, निशिगंधा, गुलाब, लिलीयम, परपल ॲार्कीड व्हाईट ऑर्कीड, ऑथोरियम, कार्नेशन, ब्लु डेजी, पिंक डेजी, तगर, चापा, कागडा, कमिनी, शेवंती, ॲार्कीड, गुलटॅाप, गुलछडी, ब्लु टॅटस, व्हाईट टॅटस, जिप्सो, तुळशी, विड्याची पाने, कामीनी, कमळ ग्लॅडीओ आदी प्रकारची फुले व पाने वापरुन संत नामदेव पायरी सह महाद्वार, विठ्ठल सभामंडप, सोळखांबी , चौखांबी, रुक्मिणी सभामंडप, परिवार देवता व व्हिआयपी गेट सह सेल्फी पॅाईंट साकारण्यात आले आहेत. या सजावटीसाठी सुमारे कामगार सेवा करत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.