133 रुपयांच्या मोमोजसाठी ‘या’ कंपनीला मोजावे लागले 60 हजार रूपये

फूड डिलिव्हरी अॅपसंदर्भात कायम वेगवेगळ्या मनोरंजक गोष्टी समोर येत असतात. दरम्यान कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये झोमॅटो अॅपवरुन मोमोज ऑर्डर केले होते. मात्र ते ऑर्डर पोहोचलीत नाही. त्यानंतर संतापलेल्या महिलेने कोर्टात केस दाखल केल्यानंतर आता कोर्टाने महिलेच्या समर्थनार्थ निकाल देत झोमॅटोला हजारोंचा दंड ठोठावला आहे.

हे प्रकरण गेल्यावर्षीचे आहे. शीतल नावाच्या एका महिलेने 31 ऑगस्ट 2023 रोजी झोमॅटोवरुन मोमोज ऑर्डर केले होते. गुगल पे च्या माध्यमातून त्यांनी 133.25 रुपये भरले होते. ऑर्डरच्या 15 मिनीटानंतर महिलेला ऑर्डर पोहोचल्याचा मेसेज आला, मात्र तिची ऑर्डर आलीही नव्हती आणि कोणी एजंटही आला नव्हता. त्यानंतर महिलेने ईमेलच्या माध्यमातून झोमॅटोला याबाबत तक्रार केली आणि 72 तास वाट पाहावी लागणार असा त्यांना मेसेज आला. तेव्हा महिलेने झोमॅटोला एक कायदेशीर नोटीस बजावली. न्यायालयात आधी वकिलाने महिलेलाच खोट्यात पाडले होते. मात्र त्यानंतर महिलेने तिच्या तक्रारीचे पुरावे न्यायालयात सादर केले असता महिला खरे बोलत असल्याचे सिद्ध झाले.

यानंतर, यावर्षी 18 मे रोजी शीतल यांनी सांगितले की, तिला झोमॅटोने 133.25 रुपये परत केले आहेत. झोमॅटोला शीतलला मानसिक तणावाची भरपाई म्हणून 50 हजार रुपये आणि तिच्या कायदेशीर खर्चासाठी 10 हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आणि एकूण रक्कम 60,000 रुपये झाली.