
रत्नागिरीच्या समुद्रात गोळप-पावसच्या परिसरात अवैध हायस्पीड ट्रॉलरचा पाठलाग करीत असताना रात्री साडेअकराच्या सुमारास परप्रांतीयांच्या 35 ते 40 हायस्पीड बोटीतील खलाशांनी गस्ती नौकेतील अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
काँग्रेसचे नाना पटोले, अमिन पटेल आदींनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, त्यावरील उत्तरात हल्ल्याची माहिती देण्यात आली. 7 जानेवारी रोजी रत्नागिरीच्या समुद्रात ही घटना घडली. याप्रकरणी कर्नाटकमधील 30 ते 35 मासेमारी नौकेतील खलाशांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परप्रांतीय नौकांची घुसखोरी रोखण्यासाठी पोलीस, मत्स्य विभाग, कोर्टगार्डच्या वतीने रत्नागिरीच्या समुद्रात गस्त सुरू असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे.