कर्नाटकात 26 वर्षीय आयपीएस अधिकाऱयाचा कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणाच्या तपासात वाहनाची एअर बॅग वेळेत उघडली नाही. त्यामुळे जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 2020 मॉडेल जीप बनावटीच्या या वाहनातून हर्ष बर्धन हे 2023 च्या आयपीसी बॅचचे अधिकारी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघाले होते. यादरम्यान वाहनाला अपघात झाला. या वेळी वाहनचालक आणि हर्ष बर्धन या दोघांनीही सीट बेल्ट घातला होता. तरीही वेळेत एअर बॅग उघडू न शकल्याने हर्ष बर्धन गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिली.