
कर्नाटकातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीजवळील सानापूर कालव्याच्या काठावर 27 वर्षीय इस्रायली पर्यटकासह दोन महिलांवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. गुरुवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. आरोपींनी तीन पुरुष पर्यटकांना मारहाण करून कालव्यात ढकलले. यापैकी एका पर्यटकाचा मृत्यू झाला. मोटरसायकलवरून आलेल्या नराधमांनी पर्यटकांना शिवीगाळ केली. पीडितांनी जाब विचारला असता त्यांनी 29 वर्षीय ‘होम स्टे ऑपरेटर’ आणि इस्रायली पर्यटकावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.