
कर्नाटक विधानसभेत आज मुस्लिम आरक्षण आणि हनी ट्रपच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला. भाजपच्या आमदारांनी विधेयकाच्या प्रती विधानसभा अध्यक्षांवर भिरकावल्या. त्यामुळे मार्शल्सना बोलावून आंदोलन करणाऱ्या आमदारांना सभागृहाबाहेर काढले तसेच 18 आमदारांना कामकाजातून 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले.