कर्नाटकच्या माजी पोलीस महासंचालकांची निर्घृण हत्या

कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आज ते बंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या हत्येचा पत्नीवर संशय असून दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरूतील के एचएसआर लेआउट येथील राहत्या घरात ओम प्रकाश यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश 2015 मध्ये राज्याचे 38 वे पोलीस महासंचालक बनले होते.