ऊस हा आरोग्यासाठी गुणकारी आहे. ऊसाचा रस तब्बेतीसाठी चांगला असतो. उसाचा रस 12 महिने मिळावा म्हणून हरियाणातील कर्नाल उस केंद्राने संशोधन करून उसाची पावडर तयार केली आहे. सहा महिने तरी उसाची पावडर टिकू शकते. संशोधनासाठी ऊस संशोधन संस्थेचे डॉ. के. हरी आणि इतर शास्त्रज्ञांनी अथक मेहनत घेऊन हा प्रयोग यशस्वी केला. ऊस संशोधन संस्थेच्या कर्नाल प्रादेशिक केंद्राचे अध्यक्ष डॉ. एम. एल. छाबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅकेटमधील उसाच्या पावडरमध्ये 200 मिली पाणी मिसळून उसाचा ताजा रस तयार करता येतो. डॉ. एम. एल. छाबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाच्या रसाची पावडर पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.