बॉलीवूडची बेबो या नावाने ओळखली जाणारी करिना कपूर खान तिच्या बोल्ड अभिनयामुळे आणि अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच करीना कपूरने Bvlgari या ब्रँडच्या नवीन परफ्यूम रेंज Bvlgari Allergra च्या लॉन्च इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. करिना कपूरने तिच्या इंन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बेबो कमालीची सुंदर दिसत आहे. या कार्यक्रमासाठी करीनाने ऑफ-शोल्डर चमकदार गाऊन परिधान केला होता. या ड्रेससोबत मॅचिंग ब्रेसलेट परिधान केला असून सिंपल मेकअप लूक केला आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत होती. बेबोने या लूकमध्ये जबरदस्त पोजेस दिल्या आहेत. तिच्या या हॉट अदांवर नेटकरी फिदा झाले आहेत.