कोण मला कास्ट करणार असेल तर… ; अभिनेत्याने सोशल मीडियावर मागितले काम

सुप्रिद्ध हिंदी मालिका ‘ये हैं मोहोब्बते’ फेम अभिनेता करण पटेल आपल्या सध्या फॉर्मात आला आहे. करण सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तो त्याच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स देत असतो. दरम्यान त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. सध्या करण कोणत्याही शो मध्ये काम करत नाहीय. ‘ये है मोहोब्बते’ ही त्याची शेवटची मालिका होती. याच पार्श्वभूमीवर त्याने जर कोणी मला कास्ट करत असेल तर कृपया त्यांनी मला कळवा, अशी पोस्ट केली आहे.

करणने रविवारी एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. ‘आता निवडणुका संपल्या आहे. हिंदुस्थानने T20 विश्वचषकही जिंकला. दीपिका पदुकोण आई होणार असून आता तिने तिचा बेबी बंपही दाखवला आहे. असो दीपिका आणि रणवीर या दोघांचेही अभिनंदन! आता आपण पुन्हा कामावर बोलू शकतो का? कृपया कोणी मला कास्ट करत असल्यास कळवा. अशी पोस्ट करणने इन्स्टास्टोरीमध्ये टाकली आहे.

करणने 2003 मध्ये त्याच्या करिअरला सुरुवात केली. कहानी घर घर की, ‘कसौटी जिंदगी की, केसर, करम अपना अपना, कस्तुरी, कसम से, नच बलिए, कौन जीतेगा बॉलिवूड का टिकट, कहो ना यार है, झलक दिखला जा 6 असे अनेक शो त्याने केले. मात्र 2013 साली सुरू झालेली ये हैं मोहोब्बते या मालिकेमुळे करणला अधिक प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये तो रमण भल्लाच्या भूमिकेत होता. या शोने करणच्या करिअरला नव्या उंचीवर नेले. मात्र यानंतर करण कोणत्याही डेली सोपमध्ये दिसला नाही.