
दिग्दर्शक, चित्रपट निर्माता करण जोहरच्या हातात महागडी बॅग दिसली. विमानतळावर स्पॉट झालेल्या करणच्या हातातील बॅगेची किंमत तब्बल 18 लाख रुपये आहे. ही बॅग गोल्ड टोगो शार्क बोलाइड 45 पीएचडब्ल्यू, इंटरनॅशनल ब्रँड हर्मिसच्या कलेक्शनमधील बॅग आहे. टाइमलेस विंटेजच्या वेबसाईटनुसार या बॅगेची किंमत 18,19,650 रुपये आहे. ही बॅग लिमिटेड एडिशनची आहे. करण जोहरने 1998 मध्ये ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट बनवला होता. त्यानंतर ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘कधी अलविदा ना कहना’ यासारखे चित्रपट बनवले आहेत.