
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अलिकडच्या एका निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित एका प्रकरणात शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, “महिलेचे गुप्तांग धरणे आणि तिच्या पायजम्याची दोरी ओढणे हा बलात्कार किंवा नाही.” न्यायालयाच्या या टिप्पणीवर कायदेतज्ज्ञांनी निषेध केला आहे.
यावर ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “देव या देशाला वाचवो, कारण असे न्यायाधीश बेंचवर आहेत! चुकी करणाऱ्या न्यायाधीशांबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका खूपच मवाळ राहिली आहे.”
कपिल सिब्बल म्हणाले, “मला वाटते की अशा वादग्रस्त टिप्पण्या करणे अयोग्य आहे. कारण सध्याच्या काळात न्यायाधीश जे काही बोलतात त्यातून समाजाला संदेश जातो. जर न्यायाधीशांनी, विशेषतः उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अशा प्रकारच्या टिप्पण्या केल्या तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल.”