
‘कांतारा चॅप्टर 1’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून 2 ऑक्टोबर 2025 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपट पुढे ढकलणार असल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर धुमापूळ घातला होता. 2022 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर ऋषभ शेट्टीने ‘कांतारा’च्या प्रीक्वलमध्ये आपली झलक दाखवली आहे. 500 हून अधिक ट्रेन फायटर, 3,000 कलाकार, आकर्षित करणारे अॅक्शन सीन्स ‘कांतारा चॅप्टर 1’मध्ये दिसणार आहेत.