कानपुरच्या रेल्वे ट्रॅकवर पुन्हा मिळाला LPG सिलेंडर, चार महिन्यातील तिसरी घटना

कानपूरमध्ये रेल्वे लाईनवर सिलेंडर मिळण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यावेळी शिवराजपुर परिसरामध्ये पाच किलो वजनाचा एक एलपीजी सिलेंडर रेल्वे ट्रॅकजवळ मिळाला आहे. हा सिलेंडर रिकामा होता आणि एका बॅगेत ठेवण्यात आला होता. याच पहिसरात चार महिन्यांपूर्वी ट्रॅकवर सिलेंडर ठेवून कालिंदी एक्स्प्रेस ट्रेनला पलटवण्याचा प्रयत्न केला होता.

8 सप्टेंबर रोजी शिवराजपूर स्थानकापूर्वी सुमारे एक किलोमीटर अंतरावर काही स्फोटक सामग्रीसह एलपीजीचा एक मोठा सिलेंडर सापडला होता. या सिलिंडरच्या साह्याने कालिंदी एक्स्प्रेस उलटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मंगळवारी रात्री शिवराजपूर स्थानकाच्या 100 मीटर परिसरात हा पाच किलोचा रिकामा सिलिंडर आढळून आला. जुन्या प्रकरणात पोलिसांसह एटीएसनेही तपास केला होता, मात्र अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. काही दिवसांनंतर, कानपूरच्या प्रेमपूर स्थानकावर 5 किलोचा सिलेंडर रेल्वेच्या मध्यभागी सापडला होता. मंगळवारी रात्री हा सिलिंडर जप्त करण्यात आला, या माहितीने जीआरपी आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. बुधवारी जीआरपी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपासासाठी एक पथक तयार केले आहे. या प्रकरणी रेल्वे कर्मचारी रमेश चंद्र यांच्या फिर्यादीवरून फारुखाबाद जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नौजचे आरपीएफ निरीक्षक ओपी शर्मा आणि निरीक्षक अभिषेक शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. त्याची फॉरेन्सिक तपासणीही केली जात असल्याचे ते सांगतात. रेल्वे रुळावर सापडलेला सिलिंडर जुना आहे, मात्र तो रेल्वे रुळाजवळ कसा आला याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल, मात्र हे सिलिंडर रेल्वे रुळांवर का सापडत आहेत, हा मोठा प्रश्न आहे.