स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेला कानपूरचा ब्रिटीश कालीन पूल गंगा नदीत कोसळला

कानपूरमध्ये दीडशे वर्ष जुना गंगा पुलाचा एक भाग मंगळवारी सकाळी कोसळला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेला हा पूल एकेकाळी कानपुर आणि लखनऊला जोडण्याचे काम करत होता. सुरक्षेच्या दृष्टीने चार वर्षांपूर्वी हा पूल कानपूर प्रशासनाने वाहतूकीसाठी बंद केला होता.

कानपुरमधील प्रसिद्ध गंगा पुलाला एक ऐतिहासिक महत्व असून त्याची देखभाल नगर निगनकडे होती. या पुलाचा वारसा जपण्यासाठी त्याच्या सौदर्यीकरणावर कोट्यावधी रुपये खर्च केले होते. मात्र मंगळवारी या पुलाचा एक भाग पत्त्यासारखा कोसळला आणि गंगा नदीत वाहून गेला. या गंगा पुलाची खासियच होती की, या पुलाच्या वरच्या भागात वाहने जायची आणि खालच्या भागात सायकल आणि पादचारी जायचे. हा ब्रिटीश कालीन पूल कानपुरहून लखनऊला जाण्यासाठी एकमेव रस्ता होता. लोकं कानपुरहून लखनऊमध्ये प्रवेश करायचे. मात्र या पुलाच्या खांब्यांना तडा गेल्याने लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीडब्लूडीच्या माध्यमातून या पुलाला बंद केले होते.

कानपुरहून शुक्लागंजला जोडणारा गंगा नदीच्या वर असलेला ब्रिटीश कालीन पूल स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. त्यावेळी क्रांतीकारकांनी गंगा नदी पार करण्यासाठी या पुलाचा वापर करायचे. त्यावेळी ब्रिटीशांनी त्या पुलावरुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ब्रिटीशांनी कानपूरच्या उन्नाव लखनऊला जोडण्यासाठी 1875 मध्ये या गंगा पुलाची निर्मिती केली होती. हा पुल बनविण्यासाठी 7 वर्ष 4 महिने लागले होते. मॅस्कर घाटावर हा प्लांट लावण्यात आला होता. ईस्ट इंडिया कंपनीचे याचे काम केले होते. दररोज 22 हजार चारचाकी, दुचाक्यांसह 1.25 लाख लोक या पुलावरुन ये-जा करत होते. 12 मीटर रुंद आणि 1.38 किमीच्या या पुलावर लोकांची वर्दळ असायची.