कर्नाटकी शास्त्रीय गायक संदीप नारायण यांनी जयपूर महोत्सवात ‘कानडा राजा पंढरी’चा हे गीत गाताच कार्यक्रमात ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर झाला. जयपूरमध्ये 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसीय जयपूर साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कानडा राजा पंढरीचा या गाण्याला उभे राहून उपस्थितांनी दाद दिली. या महोत्सवात 47 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे 31 नोबेल पुरस्कार विजेते आणि पुलित्झर पुरस्कार विजेते लेखकही साहित्य महोत्सवात सहभागी झाले आहेत. थेट जयपूरच्या धरतीवर कानडा राजा पंढरीचा हे मराठी गाणे कानावर येताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.