कामोठ्यात नाल्याजवळ बारावीच्या उत्तरपत्रिका

कामोठे बसस्टॉपच्या मागे असलेल्या नाल्याजवळ आज बारावीच्या उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा सापडला. गठ्ठय़ातील काही उत्तरपत्रिका फाटलेल्या आहेत. या उत्तरपत्रिका बुक कीपिंग अॅण्ड अकाऊंटन्सी या विषयाच्या असून हा पेपर 28 फेब्रुवारी रोजी झालेला आहे. दक्ष नागरिकांनी हा उत्तरपत्रिकेचा गठ्ठा कामोठे पोलीस ठाण्यात जमा केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर कामोठे येथे सापडलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिका या आपल्या तर नाहीत ना, असे टेन्शन आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आले आहे.

कामोठे परिसरातील रहिवासी स्नेहल बागल आज कामोठे बसस्टॉपजवळ आल्या असता एक उत्तरपत्रिका त्यांच्या पायाजवळ उडत आली. कुतूहल म्हणून त्यांनी ती पाहिली असता ती बारावीची उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला पाहिले असता बसस्टॉपच्या मागे असलेल्या नाल्याच्या काठावर उत्तरपत्रिकांचा गठ्ठा दिसला. काही मुले हा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा या ठिकाणी टाकून पळून गेल्याचे एक