‘त्या’ नराधमाला फाशी द्या! कल्याण न्यायालयाबाहेर संतप्त नागरिकांचे आंदोलन

‘जज साहब इन्साफ करो.. बिटिया के हत्यारों को फासी दो’, ‘बच्ची.. हम शरमिंदा है. तेरे कातिल जिंदा है..’ अशा घोषणांनी आज कल्याण न्यायालयाचा परिसर दणाणून गेला. कल्याण पूर्वेतील १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करणारा नराधम विशाल गवळी याला थेट फासावर चढवा अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. दरम्यान, आरोपी विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विशाल गवळी व पत्नी साक्षी या दोघांना देण्यात आलेल्या आठ दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाच्या आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायमूर्ती व्ही.ए. पत्रावाळे  यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवादवानाची ऐकून घेतल्यानंतर आयोजकांनी आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. दरम्यान नराधम विशालला न्यायालयात आणणार असल्याचे समजताच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आंदोलन केले. त्यात काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी व माजी नगरसेवक नवीन सिंग हेदेखील सहभागी झाले होते.