कल्याणध्ये परप्रांतीय अभिषेक शुक्लाने एका मराठी कुटुंबावर हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी शुक्लाला अटक केली आहे.
कल्याणच्या एका सोसायटीमध्ये अभिषेक शुक्ला राहत होता. शुक्ला मंत्रालायत कामाला असून त्याने शेजारी राहणाऱ्या एका मराठी कुटुंबाला त्रास दिला. इतकंच नाही तर या कुटुंबावर हल्लाही केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आधी दोघांना ताब्यात घेतलं होतं. आता पोलिसांनी शुक्लाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू केली आहे.
अजमेरा हाईट्समध्ये अभिजीत देशमुख यांचे कुटुंब राहत होतं. त्यांच्या बाजुला शुक्ला हा कुटुंबासोबत राहत होता. घराबाहेर धुप लावण्यावरून शुक्लाने देशमुख यांच्यांशी वाद घातला. तुम्ही मराठी माणसं घाणेरडी असतात. मच्छी मटण खातात, तुमच्या मराठीपणाची हवा बाहेर काढतो अशी धमकी शुक्लाने देशमुख यांना दिली. तसेच मी मंत्रालयात काम करत असून 56 मराठी लोक माझ्यासमोर झाडू मारतात असेही हा शुक्ला बरळला होता. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.