प्रसिद्ध गायिका कल्पना राघवेंद्रचा पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

साऊथ सिनेमा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका कल्पना राघवेंद्र हिने नुकताच जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सध्याच्या घडीला त्यांना हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेले आहे. कल्पना यांच्या आत्महत्येचे सध्या कोणतेही कारण समोर आलेले नाही. हैद्राबादमधील निजामपेट येथील राहत्या घरी त्यांनी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. साऊथमधील ख्यातनाम गायिका म्हणून कल्पना राघवेंद्र यांची ओळख सर्वज्ञात आहे. त्यांनी रवि तेजा आणि चिरंजीवी यासारख्या कलाकारांसमवेत काम केलेले आहे.

 

माहितीनुसार, याआधी सुद्धा कल्पना यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले होते. वैयक्तिक आयुष्यातील काही तक्रारी आणि घडामोडींमुळे त्यांनी हा प्रयत्न केला असल्याचे समजले होते. कल्पना यांचे आई वडिल दोघेही गायन क्षेत्रात कार्यरत असून, आईमुळेच कल्पना यांनी गायन क्षेत्रात प्रवेश केला होता.

कल्पना या तेलगु सिंगर बिग बाॅस या कार्यक्रमातील स्पर्धक होत्या. वयाच्या पाचव्या वर्षांपासून कल्पना यांनी गायन करण्यास सुरुवात केली होती. कल्पना यांनी आत्तापर्यंत तब्बल 1500 गाणी रेकाॅर्ड केली आहेत. तसेच देशा-परदेशामध्ये त्यांनी ३ हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम केले आहेत. गायनाबरोबरीनेच कल्पना या अभ्यासातही तरबेज होत्या. कल्पना या केवळ गायक नसून, त्या म्युझिक कंपोझर, अभिनेत्री आणि गाणं लिहण्यातही वाकबगार आहेत.

कल्पना राघवेंद्र यांनी ख्यातनाम संगीतकारांसोबत काम केलेले आहे. यामध्ये इल्लेया राजा, एम एस विश्वनाथ, शंकर महादेवन, चित्रा, ए आर रहमान आणि बालसुब्रमणियम यांच्या नावाचा समावेश आहे.