
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कालनिर्णय’ने वाचकांसाठी ‘पाकनिर्णय -2026’ ही पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त वाचकांसाठी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘पाकनिर्णय’ स्पर्धा चार विभागांत होणार आहे. 1) केळय़ापासून बनवलेले पदार्थ, 2) करीज/ ग्रेव्हीज, 3) वन पॉट मील, 4) जॅम/ जेली/ मार्मलेड/ मुरांबा/ मोरावळा असे स्पर्धेचे चार विभाग आहेत. प्रत्येक स्पर्धक जास्तीत जास्त दोन विभागांसाठी आपली पाककृती पाठवू शकतो. स्पर्धकांनी आपली पाककृती आणि पाककृतीचा स्पष्ट फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा पोस्ट/ कुरियरने पाठवावा. तसेच पाककृती www.kalnirnay.com/paknirnay या लिंकवर अपलोड करू शकता. प्रथम आपले नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी त्यानंतर पदार्थाचे नाव, साहित्य आणि कृती याच क्रमाने पाककृती लिहून पाठवायची आहे. पाककृती पाठवण्याची अंतिम तारीख 15 मे 2025 रोजी आहे. प्रत्येक विभागातून तीन विजेते निवडण्यात येतील. सर्वोत्कृष्ट 12 पाककृती ‘कालनिर्णय मराठी 2026’, तर उत्तेजनार्थ 18 पाककृती ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक 2025’ मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. काही खास पाककृती ‘स्वादिष्ट 2026’ मधून प्रसिद्ध होतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ‘कालनिर्णय’च्या वेबसाईटला भेट द्या, असे ‘कालनिर्णय’चे संपादक, प्रकाशक जयराज साळगावकर यांनी कळवले.
पाककृती पाठवण्याचा पत्ता –‘पाकनिर्णय स्पर्धा 2026’, सुमंगल प्रेस प्रा. लि. 172, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, एम. एम. जी. एस. मार्ग, दादर पूर्व, मुंबई 14. दूरध्वनी- 022- 24135051/31030826.