
कळंब शहरातील श्री. साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी (लि. बीड) येथील शाखेने तब्बल 1कोटी 90 लाख रुपयांचा गंडा ठेविदारांना घातला आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही वर्षांपुर्वी बीड येथील साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी (लि. बीड) सन 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती. कळंब शहरातील अनेकांनी विश्वासाने आयुष्यभराची या मल्ट्रिस्टेट मध्ये ठेवी ठेवल्या होत्या. मागील काही महिन्यापासून ही मल्टीस्टेट बंद होती. अनेक ठेविदारांनी चकरा मारल्या परंतु हाती काहीच आले नाही. अखेर कळंब शाखेचे मल्टीस्टेट चे मॅनेजर बाळासाहेब भुजंगराव कुपकर यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या मध्ये सन 2017 पासून ते दिनांक 30 जून 2024 या कालावधी मध्ये इतर ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमीष दाखवून आकर्षित करुन श्री. साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी, लि. बीड, शाखा कळंब शाखा येथे ठेवी ठेवण्यास सांगुन सदर ठेवीची मुदत पुर्ण झाल्यानंतर ठेवीदार हे वारंवार ठेवीची रक्कम परत मिळणेबाबत शाखेत गेले असता त्यांना उडवाडवीचे उत्तरे देवून संचालकांनी ठेवीदार यांची 1 कोटी 90 लाख 53 हजार 690 रुपयाची फसवणुक केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी 12 जणांविरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक रवी सानप करत आहेत.
नितीन जरिचंद भिसे (शाखा कळंब शाखा अधिकारी) साधना शहीनाथ परभणे (अध्यक्ष) श्रीराम सुर्यभान बोबडे (उपाध्यक्ष), शाहीनाथ विक्रमराव परभणे, (संचालक), सुभाष आप्पासाहेब उगले (संचालक), लक्ष्मण विक्रमराव परभणे (संचालक) अर्चना रविंद्र सुपेकर (संचालक), अर्जुन पंडीत कांबळे (संचालक), संजय पाटीलबुवा सावंत (संचालक), शिवाजी निवृत्ती खोड (संचालक) भगवान भानुदास काळे (संचालक), विठ्ठल ज्ञानदेव जाधव (संचालक), साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा कळंब येथील सर्व कर्मचारी यांच्या विरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.