कैलास मानसरोवर यात्रा जूनपासून

कैलास मानसरोवर यात्रा यंदा जूनपासून सुरू होणार असून ऑगस्टपर्यंत चालेल. सुमारे पाच वर्षांच्या अंतरानंतर ही यात्रा पुन्हा सुरू होत आहे. या वर्षी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी दोन मार्ग असून उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून पाच गट जातील. सिक्कीम राज्यातील नाथूला खिंडीतून 10 गट जातील, येथेही प्रत्येक गटात 50 प्रवासी असतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने आज स्पष्ट केले.