कैलास मानसरोवर यात्रा लवकरच सुरू होईल

गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेली कैलास मानसरोवर यात्रा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जायसवाल यांनी गुरुवारी दिली. भारत आणि चीनचे संबंध सुधारत असून कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये विचार सुरू असल्याचे जायसवाल म्हणाले. यात्रा याच वर्षी सुरू होईल, आम्ही याची तयारी करत आहोत. लवकरच जनतेला याची माहिती दिली जाईल, असेही ते म्हणाले.